Skip to main content

Posts

Showing posts from April, 2018
विषय :- फुले,शाहू,आंबेडकर  सर्वांसाठी साधन झाले तरीही विचारातून आचार साध्य का नाही?        "प्राजक्ताचं सांडणं हे प्रारब्धच असतं         तरीही तो फुलणं थांबवत नाही         पायदळी जरी तुडविले कोणी तरी         सुंगधाच देणं तो देणं थांबवत नाही".      (संकलन-आम्ही साहित्यिक,फेसबुक गृप)        वरील विकास पवार यांच्या चारोळी प्रमाणे महापुरुषांच्या विचारांची महती असते.        काळ कुठलाही असो व त्यातील महापुरुष, विचारवंत हा कधीच पूर्ण नसतो.त्यांना मर्यादा असतात .महापुरुषांचे विचार जरी महान असले आज आपण त्यांना एका चौकटीत बंद केले आहे.फुले माळ्यांचे,आंबेडकर हे बुध्दांचे,शिवाजी हे मराठ्यांचे असे वाटून टाकले आहे.त्यांच्या नावाचे व विचारांचे ऐवढ्या प्रमाणात तुकडे केलेत कि 'विचार' म्हणजे काय हे शोधावे लागेल? ईश्वराने सृष्टी निर्माण केली.ती सुंदर दिसावी म्हणून सप्तरंगाची मनसोक्त उधळण केली.किती स्वार्थ रहित विचार व कृती आहे  ईश्वराची.पण स्वार्...