Skip to main content


विषय :-
फुले,शाहू,आंबेडकर  सर्वांसाठी साधन झाले तरीही विचारातून आचार साध्य का नाही?

       "प्राजक्ताचं सांडणं हे प्रारब्धच असतं

        तरीही तो फुलणं थांबवत नाही

        पायदळी जरी तुडविले कोणी तरी

        सुंगधाच देणं तो देणं थांबवत नाही".

     (संकलन-आम्ही साहित्यिक,फेसबुक गृप)
       वरील विकास पवार यांच्या चारोळी प्रमाणे महापुरुषांच्या विचारांची महती असते.
       काळ कुठलाही असो व त्यातील महापुरुष, विचारवंत हा कधीच पूर्ण नसतो.त्यांना मर्यादा असतात .महापुरुषांचे विचार जरी महान असले आज आपण त्यांना एका चौकटीत बंद केले आहे.फुले माळ्यांचे,आंबेडकर हे बुध्दांचे,शिवाजी हे मराठ्यांचे असे वाटून टाकले आहे.त्यांच्या नावाचे व विचारांचे ऐवढ्या प्रमाणात तुकडे केलेत कि 'विचार' म्हणजे काय हे शोधावे लागेल? ईश्वराने सृष्टी निर्माण केली.ती सुंदर दिसावी म्हणून सप्तरंगाची मनसोक्त उधळण केली.किती स्वार्थ रहित विचार व कृती आहे  ईश्वराची.पण स्वार्थी मानवाने काय केले जातीचे राजकारण करुन रंग वाटून घेतले.भगवा रंग हिंदूचा,निळा बौद्ध लोकांचा,हिरवा मुसलमान लोकांचा इत्यादी.
      शाहू,फुले,आंबेडकर इत्यादी सह अनेक विचारवंत यांनी त्या त्या काळात मौल्यवान विचारांचे  योगदान दिलेले आहे.या विचारांचा मुळ उद्देश हा हा मानवी कल्याण व विकास हा होता.पण काही स्वार्थी लोकांनी विचारवंत यांच्या नावाने दुकानदारी चालू केली आहे.याचा अर्थ या महापुरुषांच्या विचारांना आप कमाईचे साधन बनवले.वास्तविक पाहिलं तर स्वतः शाहू,फुले,आंबेडकर यांनी स्पष्ट सांगितले आहे कि त्यांचे विचार हे साधन आहे.आमची वाटणी करु नका.आमच्यापैकी कुणी एकही मानवी जीवनाचे सत्य सांगू शकत नाही.आपण त्यांचा अभ्यास करुन या विचारांना साध्य बनविले पाहिजे.
     चित्रपटात एखादा कलाकार हा आपल्या अभिनयाने लोकांना एक क्षणभर हसवू शकतो पण नेहमी साठी त्यांचे दुःख दूर करु शकत नाही. हा आपण प्रेरणा मात्र घेवू शकतो.तरच विचारातून आचार साध्य होतील.
- जयंत जाधव,लातूर.

Comments

Popular posts from this blog

रियालिटी शो.... नेमकी रियालिटी काय आहे?

सध्या प्रत्येक टि.व्ही. वाहिनीवर रियालिटी शो यांनी खूपच धुमाकुळ घातला आहे व प्रेक्षक देखील मोठ्या आवडीने असले कार्यक्रम पसंत करतात.पण खरच या रियालिटी शोमधून वास्तविकता दाखविली जाते का?बहुतांशी या शोंमध्ये सत्य वा खरेपणा दाखवत नाही किंवा ते ठरवून त्यांना जे पाहिजे ते (स्क्रिप्टेड) दाखवत असतात. एकुणच रियालिटी शोंमध्ये खरेपणा नसतोच.रियालिटी शोंचा उद्देश फक्त पैसा कमाविणे हाच असतो.याला शुद्ध व्यावसायिकता म्हणता येईल.म्हणून तर नृत्य व गायन स्वरूप असलेल्या रियालिटी शोंमध्ये आक्रमकता,जोर जोराने ओरडणे,वेगवेगळ्या ड्रामा इत्यादींचा अतिरेकपणा नेहमीच दिसून येतो.यामध्ये सहभागी कलाकारांना शोचे परिक्षक कधी कधी ऐवढे रागवतांना वा डाफरतांना दिसतात कि त्या कलाकार वा स्पर्धकाच्या मनावर,शरीरावर भयानक त्रास होवून त्याला दवाखान्यात भरती करण्याचे प्रकार झाले आहे.अर्थात त्याला प्रेमाने वा दुसऱ्या मार्गाने देखील सहभागी स्पर्धकाला त्याच्या चूका समजावून सांगता येऊ शकते. सहभागी स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढविण्या ऐवजी त्यांचा अपमान करतात.यामागे फक्त रियालिटी शोची लोकप्रियता वाढविण्यासाठी मोठ्याने रागवण्याचे ...