सध्या प्रत्येक टि.व्ही. वाहिनीवर रियालिटी शो यांनी खूपच धुमाकुळ घातला आहे व प्रेक्षक देखील मोठ्या आवडीने असले कार्यक्रम पसंत करतात.पण खरच या रियालिटी शोमधून वास्तविकता दाखविली जाते का?बहुतांशी या शोंमध्ये सत्य वा खरेपणा दाखवत नाही किंवा ते ठरवून त्यांना जे पाहिजे ते (स्क्रिप्टेड) दाखवत असतात.
एकुणच रियालिटी शोंमध्ये खरेपणा नसतोच.रियालिटी शोंचा उद्देश फक्त पैसा कमाविणे हाच असतो.याला शुद्ध व्यावसायिकता म्हणता येईल.म्हणून तर नृत्य व गायन स्वरूप असलेल्या रियालिटी शोंमध्ये आक्रमकता,जोर जोराने ओरडणे,वेगवेगळ्या ड्रामा इत्यादींचा अतिरेकपणा नेहमीच दिसून येतो.यामध्ये सहभागी कलाकारांना शोचे परिक्षक कधी कधी ऐवढे रागवतांना वा डाफरतांना दिसतात कि त्या कलाकार वा स्पर्धकाच्या मनावर,शरीरावर भयानक त्रास होवून त्याला दवाखान्यात भरती करण्याचे प्रकार झाले आहे.अर्थात त्याला प्रेमाने वा दुसऱ्या मार्गाने देखील सहभागी स्पर्धकाला त्याच्या चूका समजावून सांगता येऊ शकते. सहभागी स्पर्धकांचा आत्मविश्वास वाढविण्या ऐवजी त्यांचा अपमान करतात.यामागे फक्त रियालिटी शोची लोकप्रियता वाढविण्यासाठी मोठ्याने रागवण्याचे प्रकार मुद्दाम घडवून आणले जातात.
निर्ल्लजपणाचा कळस म्हणजे मोठ्या स्टार सेलिर्बेटिज लोकांची प्रेम प्रकरणे मुद्दाम घडवून आणतात व नंतर रियालिटी शो संपला कि वास्तविक जीवनात ते कलाकार एकमेकांच्या जीवनातून अलग झालेले आहेत. कित्येक रियालिटी शोमध्ये तर शो जिंकण्यासाठी चांगला पुरुष असून देखील ‘गे’ किंवा लेस्बियन असल्याचे भासवून लोकांच्या भावनेशी खेळ केले आहेत.
सध्या एक अशाच रियालिटी शो बिग बॉस प्रसिद्धीच्या झोतात आहे.या शो द्वारे एवढी अश्लिलता व वादविवाद निर्माण केले. जातात की लोकांचे शो बद्दलचे आकर्षण कायम राहावे हाच उद्देश असतो.खरच यात सहभागी कलाकार त्यांच्या ख-या जीवनात असले घाणरडे वागत असतील का? कि निव्वळ पैसासाठी यांची ही नाटके असतात.अगदी असलेच हिंदी बिग बॉसच्या पावलावर पाऊव ठेवून बिग बॉस मराठी वर्जनने तर मुर्खपणाचा कळस केला आहे.आपण प्रेक्षक मात्र आपली कामे सोडून मुर्खासारखे यांचे हे असले खोटे रियालिटी शो पाहत बसतो.
रियालिटी शोंच्या बाबतीत संशोधन करताना एक गोष्ट स्पष्ट आहे कि बहुतेक शो हे पाश्चिमात्य देशांच्या रियालिटी शोची कार्बन कॉपी वा नक्कल असते.जे भारतीय संस्कृतीला मारक असेच आहे.उदाहरणार्थ शोमध्ये लाईव्ह सेक्स करणे व ते दाखविणे परदेशात सकारात्मक असेल पण तेच भारतात दाखविणे शक्य नाही.शो मध्ये दाखविल्याप्रमाणे युवावर्ग पाश्चात्त्य संस्कृतीकडे आकर्षित होण्याचे प्रमाण वाढले आहे.
आजच्या युगात हसवणे हा देखील चांगले पैसे कमाविण्याचा धंदा झाला आहे.कॉमेडी शो तर अक्षरशः महापूर आलेला आहे.पण कॉमेडी करताना ऐवढी अश्लिल व विभत्स केली जाते की कुटुंबासोबत एकत्र तो शो आपण पाहूच शकत नाही .
सारांश,एखादा रियालिटी शो खरच कलाकारांच्या प्रतिभेला प्रोत्साहन देत असेल तर हरकत नाही पण जर समाजात अभद्रता,अश्लिलता,घाणेरेडापणा पसरविण्याचे काम करत असेल तर या शोंवर बंदी घालणेच योग्य आहे.सर्वात महत्त्वाचे रियालिटी शो हे पारदर्शक असायला पाहिजे.
Comments
Post a Comment